१. पुणे महानगरपालिका सायकल क्लबच्या वतीने संकेतस्थळावर जाहीर केलेल्या सर्व उपक्रमात स्वयंप्रेरणेने सहभागी होता होईल. विविध ठिकाणी होणाऱ्या कयसाले फेरीसाठी आपली स्वतःची सुस्थिथतील सायकल घेऊन वेळेवर उपस्थित राहावे लागेल.
२. लघुकालीन सायकल फेरी/ दिर्घकालीन सायकल फेरी / सायकल रॅली व विविध कार्यक्रमांसाठी आपणांस आपल्या स्वखर्चाने उपस्थित राहावे लागेल. तसेच पुण्यात व पुण्याबाहेर असणाऱ्या सायकल फेरीसाठी आवश्यकतेनुसार आपण आपला चहापान, जेवण, राहणे, वाहतूक, वैद्यकीय व इतर अनुषंगिक खर्च आपण स्वतःच करावयाचा आहे.
३. सायकल चालवताना हेल्मेट सक्तीचे असून , सर्व वाहतूक नियमांचे पालन करावयाचे आहे .
४. उपक्रमांची माहिती पुणे महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल .
५. सायकल फेरीमध्ये व बाहेर ऑउटडोर सायकलिंगमध्ये सायकल चालवताना पुरेशी काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच दिलेल्या सर्व साहित्याची जबाबदारी आपली राहील.
६. आपण आपल्यासोबत बाळगत असलेल्या सर्व साहित्याची जबाबदारी आपली राहील.
७. सायकल चालवताना कोणत्याही कारणामुळे प्रसंगी गंभीर प्रसंग उद्भवून, गंभीर अपघात होऊन प्रसंगी मृत्यूही होऊ शकतो याची मला जाणीव आहे.ह्याबाबत पुणे महानगरपालिका सायकल क्लब जबाबदार राहणार नाही.
८. पुणे महानगरपालिका सायकल क्लबच्या उपक्रमात स्वयंप्रेरणे, पर्यावरण रक्षणासाठी, ध्वनी /वायू प्रदूषण कमी करण्यासाठी , आरोग्यासाठी तसेच स्वतःच्या आनंदासाठी सामील होत आहे .
९. सदरचे राबविण्यात येणारे सर्व उपक्रम जनहितार्थ असून स्वयंप्रेरणेने त्यात सहभागी व्हायचे आहे. यासाठी कोणताही मोबदला मिळणार नाही .
१०. सदर सभासदत्व हे निःशुल्क असून हे सभासदत्व फक्त सायकल उपक्रमात भाग घेण्यासाठी आहे . ह्याबाबत कुठल्याही प्रकारची तक्रार स्वीकारली जाणार नाही. तसेच हे सभासदत्व सायकल उपक्रमांपुरते मर्यादित असून उपक्रमात सहभागी होऊ देणे अथवा न देणे अथवा सभासदत्व करून ना घेणे याचे अधिकार पुणे महानगरपालिका सायकल क्लबने राखून ठेवले आहेत.
११. सादर उपक्रमांत १८ वर्षांपुढील भारतीय नागरिकांस भाग घेता येईल.
१२. रॅलीमध्ये कोणत्याही मौल्यवान वस्तू बाळगू नयेत,तसेच आपणास आवश्यक असणारी औषधे बरोबर ठेवावी .
१३. वरील सर्व अटी / नियम मला मान्य असून मला पुणे महानगरपालिका सायकल क्लब उपक्रमात सहभागी होण्यासाठी सभासद करून घेणेस विनंती आहे
Copyright © 2019 PMC. All Rights Reserved.
We would like to see you more.